डाॅ. प्रल्हाद वडगांवकर दांपत्याचा लग्नाचा 55 वा वाढदिवस सत्यशोधक पद्धतीने विवाह करून संपन्न झाला

पुणे : महात्मा फुले,शाहू,आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाची बांधीलकीने गेली अनेक वर्षे समाजकार्य करीत असलेले कर्मवीर,योगाचार्य,प्रा. डाॅ. प्रल्हाद वडगांवकर  संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुणे यांचे 86 व्या व पत्नी शीलाताई  यांचे वयाचे 78 व्या वर्षी लग्नाचा  55 वा वाढदिवस  सत्यशोधक विवाह पद्धतीने दि. 12 जून 2021 रोजी सायंकाळी 6.40 वा. विवाह करून संपन्न झाला.  फुले ,शाहू,आंबेडकर एज्युकेशनल व सोशल फौंडेशन चे अध्यक्ष व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी तो विवाह  विधी  राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुणे चे  राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानांतर्गत सुरू केलेल्या सत्यशोधक विवाह अभीयानानुसार बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राद्वारे  हा 27 वा सत्यशोधक विवाह संपन्न केला .
यावेळी मुलगी डाॅ. उज्वला  गुळवणी हिचा 49  वा वाढदिवस  सत्यशोधक   पद्धतीने विधी करून सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी संपन्न  केला.
यावेळी डॉ.वडगांवकर म्हणाले की यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले पण आज सत्यशोधक विवाह करून  महापुरुषांचे कृतिशील कार्याचा धागा बनलो हाच माझा मोठा गौरव आहे.
याप्रसंगी मुली उज्वला गुळवणी आणि कांचन कुलकर्णी यांनी बाबांचा या वयात सत्यशोधक विवाह करून पुन्हा एकदा नव्याने उभारी मिळणार आहे. व इतरांना महापुरुषांचे विचाराने पुढे चला यातच धन्य आहे हा विचार देऊन जात ,धर्म विसरून लोकांनी अंतर जातीय विवाह करून जातीयता नष्ट करावी.. त्या पुढे असेही म्हणल्या की   एकमेकांचे आचार ,विचार ,कष्टाने पुढे जाण्याची जिद्द पाहुन व घरच्यांचे सम्मतीने लग्न केल्यास सर्व काही चांगलेच  घडते याचे  आम्ही दोघी बहिणी  उदाहरण आहोत.
यावेळी सुरवातीला डॉ .प्रल्हाद  आणि शीला वडगांवकर यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला तसेच राष्ट्रीय ग्रंथ भारतीय संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय यांचे सर्वांनी पूजन केले तर हनुमंत टिळेकर व ढोक यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड व मंगलाष्ठाकाचे गायन केले .याप्रसंगी सर्वाना कवी डॉ.वडगांवकर लिखित  महात्मा फुले गीत चरीत्र व ढोक लिखित ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ग्रंथाचे वाटप केले. यावेळी अक्षता म्हणून फुले वापरुन नूतनीकरण सत्यशोधक विवाहाला रंगत आणली.यासाठी मोलाचे सहकार्य जावई रमेश कुलकर्णी, आकाश ढोक व पत्रकार ज्ञानेश्वर जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन जावई आर्टिस्ट श्रीकांत गुळवणी यांनी मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!