जळोची : फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेज, सावळ या शाळेमध्ये सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासात विद्यार्थ्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने *ज्या विद्यार्थ्यांचे कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरवले आहे* अशा विद्यार्थ्यांना शाळेने मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्षात फी न वाढवता आहे त्या फी मध्ये 15% सवलत दिली आहे. त्याचबरोबर आजी माजी सैनिकांच्या मुलांना देखील मोफत शिक्षण, मुलींच्या फी मध्ये 20% सवलत,अनाथ मुलांना मोफत शिक्षण, वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना फी मध्ये 50% सवलत, इत्यादी सवलती देऊन शाळेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. विशेष सवलती देण्यासाठी नेहमीच प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे हे नेहमीच आघाडीवर असतात तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे,अलका आटोळे, पल्लवी सांगळे, ललित भरणे,दिपक सांगळे, दिपक बिबे,सीईओ संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, राधा नाळे, निलिमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर यांचेही मोलाचे योगदान या ठिकाणी नेहमीच लाभते.