बिबी ( सुरेंद्र फाळके ) : बिबी येथे 10 जुन रोजी विलगीकरण कक्ष येथे आज नलवडे कुटुंबातील सदस्य रिटायर्ड सहाय्यक पोलिस फौजदार बापूराव लक्ष्मण नलवडे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आज बिबी येथील विलगीकरण कक्षातील कोरोना बाधीत रुग्णांना केळी, संत्रे, सफरचंद, अंडी, वाटप करण्यात आले.
यावेळी बिबी ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रिती निलेश काशिद, जेष्ठ नेते बळवंतराव लक्ष्मण नलवडे (दादा मामा ) श्रीमती संगीता बाळासाहेब बोबडे, श्री राकेश बापूराव नलवडे सर ,आप्पासाहेब मोरे गुरुजी, अनिल बोबडे, संजय बोबडे, प्रितम बोबडे, सचिन दीक्षित,आप्पा बोबडे, संदिप काशिद व ग्रामस्थ उपस्थित होते .
नलवडे कटुंबाच्या या कार्याचे ग्रामस्थ बिबी यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात आले .