शेतीविषयक दुकानांबाबत व शैक्षणिक साहित्य पुरविण्याबाबत प्रशासनाचे सुधारीत आदेश

सातारा दि.11 (जिमाका): सातारा जिल्ह्यात 7 जून पासून जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार यादिवशी संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी वैध कारणाशिवाय कोणत्याही नागरीकास संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये सुधारणा करुन शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणा-या सेवांची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेतीविषयक (मशागत)करण्याची सेवा करण्यास आठवड्याचे सर्व दिवस सायं 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

                तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 14 जानेवारी पासून सकाळी 9 ते 2 या वेळेत केवळ शैक्षणिक साहित्य घरपोच पुरविण्यास परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!