शिवराज्याभिषेकदिनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे उदघाटन हे सत्यशोधक पुनर्विवाह लावून शानदार पणे समपन्न झाला.
पुणे दि. 6 : ( फलटण टुडे वृत्तसेवा )
फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या वतीने दि.6जुन2021 शिवराज्याभिषेक दिनी दु.12 वा. 26 वा सत्यशोधक पुनर्विवाह दीपाली मेहेर,विधवा ,कल्याण आणि रामचंद्र डोके,विधुर ,मोशी यांचा बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे उद्घाटन करून शानदार पणे सम्पन्न झाला.
यावेळी सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सिने कलाकार निवृत्ती उर्प आप्पा बोराटे यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची फोटो प्रेम भेट देण्यात आली.
वधु वर यांचे शुभहस्ते प्रथम थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला तर युगपुरुष बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो ला पुष्पहार व सत्यशोधक केंद्राचे उदघाटन सिने कलाकार मा. निवृत्ती बोराटे यांचे हस्ते फित कापून हे केंद्र लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्यासाठी व वधु वर यांना आशिर्वाद देण्यासाठी राज्याचे अन्नपुरवठा नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री व नाशिक चे पालकमंत्री ना.छगन भुजबळ हे कोव्हिडं 19च्या व्यस्त कार्यामुळे येऊ शकले नाही परंतु त्यांनी पाठविलेल्या शुभसंदेशा मध्ये म्हंटले की सर्व समाजाने अंधश्रद्धा, कर्मकांड व आर्थिक उधळपट्टी न करता समाजात महापुरुषांचे विचाराने सत्यशोधक विवाह करावेत .तसेच सत्यशोधक विवाह जनजागृतीचे कार्य जर अखंड पणे चालू राहिले तर समाज नक्कीच बदलेल.आणि हे काम फुले एज्युकेशन संस्था गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्र व महाराष्ट्राटाचे बाहेर जाऊन करीत आहे म्हणून सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे अभिनंदन केले.
यावेळी सिनेकलाकार निवृत्ती बोराटे म्हणाले की फुले दाम्पत्याने केलेले कार्य अलौकिक असे असून त्याच्या विविध कार्याचा अभ्यास केला तर समाजपरिवर्तन हे लगेचच होते.पुढे ते असे म्हणाले की त्यांच्या कार्याचा एक धागा घेऊन आज हे केंद्र सत्यशोधक विवाहाच्या माध्यमातून मोफत विवाह लावत आहे हे देखील प्रेरणा समाजाला प्रेरणादायी ठरणार आहे .
सत्यशोधक चित्रपटाचे 80 टक्के काम पूर्ण करून लवकरच चित्रपट प्रदर्शित करणार असल्यामुळे त्यांचा व पत्रकार ज्ञानेस्वैर जाधव,नम्रता कामत आणि मुंबई वरून खास आलेले पत्रकार कैलास डोके,सामाजिक कार्यकर्ते मोहन बटवाल ,श्रीमती वनिता मेहेर यांचा सत्कार रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले गीत चरीत्र ,ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ग्रंथ व फुले दाम्पत्य फोटो प्रेम तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.तर सत्यशोधक निवृत्ती बोराटे यांनी ढोक परिवार व हनुमंत टिळेकर व सुदाम धाडगे यांना फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
हा सत्यशोधक विवाह रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत लावला तर महात्मा फुले रचित मंगळाष्टके व सत्याचा अखंड गाऊन सुदाम धाडगे , हनुमंत टिळेकर व रघुनाथ ढोक यांनी भारतीय संविधान उद्देशिका सर्वांकडून वदवून या सोहळ्याची शोभा वाढविली.
यावेळी अक्षता म्हणून फुलांचा वापर करण्यात आला .या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य समता परिषदचे रवी सोनावणे , आकाश-क्षितिज ढोक ,भूषण मेहेर,प्रशांत डोके यांनी केले तर शेवटी सौ. आशा ढोक यांनी आभार मानले.