फलटण :-वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे असे श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर बोलत होते
दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण व त्यामुळे सर्वच देशांच्या दृष्टीने धोकादायक ठरणारे जागतिक तापमान वाढ हा विषय हा अलीकडे खूप गंभीर बनू पाहत आहे या जागतिक तापमान वाढीमुळे अवेळी पाऊस, त्सुनामी, भूकंप, ज्वालाग्रहीच्या समस्या, वेगवेगळ्या प्रकारची वादळे अशी अनेक संकटे केवळ आपल्या देशावरच येत आहेत असे नाही तर संपूर्ण जगावर येऊ पाहत आहेत यासाठी या संकटांना रोखण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन फलटण तालुक्याचे युवा नेते तथा गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
या वेळी बोलताना पुढे श्रीमंत सत्यजितराजे म्हणाले की, मानवाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गाची लयलूट केली आहे ही लयलूट करीत असताना निसर्गाचा समतोल राखला गेला नाही आणि त्यामुळे अवेळी पाऊस, त्सुनामी, भूकंप, ज्वालाग्रहीचा उद्रेक व वेगवेगळ्या प्रकारची वादळे अशी एक ना अनेक संकटे येत आहेत. तरी भविष्यात आपणाला या संकटापासून दूर राहावयाचे असेल तर “झाडे लावा झाडे जगवा” हा मंत्र सर्वांनाच जपावा लागेल तरच निसर्गसृष्टी अबाधित राहील असेही शेवटी श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर म्हणाले.