भारतीय लष्करात महिलांना मोठी संधी

बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
भारतीय लष्करातील सोल्जर जनरल ड्युटी म्हणजेच वुमन मिलिटरी पोलीस या पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे .यासाठी शंभर जागा असून त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जॉईन इंडियन आर्मी या संकेतस्थळावर सुरु आहे.ऑनलाईन रजिस्ट्रेशन 6 जून ते 20 जुलै 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर महिला उमेदवारांना त्यांच्या इमेलवर एडमिट कार्ड पाठवले जाणार आहे त्या एडमिट कार्ड वर भरतीचे ठिकाण ,दिनांक ,वेळ इत्यादी सर्व गोष्टी नमूद असणार आहेत ही रॅली महाराष्ट्रातील उमेदवारांना पुण्यामध्ये असणार आहे. यासाठीची वयाची पात्रता ही साडेसतरा ते 21 वर्ष या दरम्यान असणार आहे म्हणजेच महिला उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 2000 ते एप्रिल 2004 या दरम्यान असावा . उंची 152 सेंटीमीटर ,वजन उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे. यासाठीचे शिक्षण 45 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावे. शारीरिक पात्रता मध्ये काही घटकांना सवलत देण्यात आली आहे. यामध्ये आजी-माजी सैनिकांच्या मुली ,शहीद सैनिकांच्या मुली यांना उंची दोन सेंटीमीटर, वजनात दोन किलो सवलत देण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते या शारीरिक क्षमता चाचणी 1.6 किलो मीटर म्हणजे सोळाशे मीटर धावणे हा महत्त्वाचा प्रकार आहे त्यासाठी गुणांकन आहे त्याचबरोबर लांब उडी ,उंच उडी या प्रकारांचा समावेश आहे पण त्यांना गुण दिले जाणार नाहीत .शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर महिला उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे.या वैद्यकीय चाचणीत शारीरिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या फिट असणे आवश्यक आहे तसेच प्रेग्नेंसी व टॅटू ला प्रतिबंध केला आहे. परमनंट टॅटू हाताच्या दर्शनी भागावर असेल तर उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागेल.वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. या लेखी परीक्षेतून आजी-माजी सैनिकांच्या मुली विधवा व एनसीसी धारक महिला उमेदवार यांना काही गुण गुण दिले जातात. अशा पद्धतीने मैदानी चाचणी व लेखी परीक्षेतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे पण उमेदवारांची संख्या जास्त  आल्यास दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची संख्या मर्यादित केली जाईल तरी पात्र  महिला उमेदवार यांनी भरती साठी प्रत्यन करावेत अशी माहिती जळोची येथील  सह्याद्री करिअर अकॅडमी  चे प्रा उमेश रूपनवर यांनी दिली आहे
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!