गोखळी येथील विलगीकरण कक्षास श्रीमंत संजीवराजे यांची भेट


गोखळी : 
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील कोरोना विलिनीकरण कक्षातील कोरोना मुक्त ७ रूग्णांना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते झाडं देऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
गोखळी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकसहभागातून तरूणांनी सुरू केलेल्या कोरोना विलिनीकरण कक्षास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भेट कामकाजाबाबत आढावा घेतला.आज अखेर विलिनीकरण कक्षात ७३ रुग्ण दाखल झाले त्यापैकी ५० कोरोना मुक्त रुग्णांना निरोप देण्यात आला तर दोन रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत. सध्या २१ रुग्ण दाखल आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी दिली. श्रीमंत श्रीमंत संजीवराजे यांनी विलगिकण कक्षातील रूग्णांशी संवाद साधला .
यावेळी गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज गावडे,खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, विश्वासदादा गावडे,   श्रीराम साखर कारखान्याचे संचालक महादेव माने श्रीराम साखर कारखान्याचे संचालक संतोष खटके, माजी सरपंच नंदकुमार गावडे, अजित गावडे, अक्षय रोकडे, योगेश गावडे पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर गावडे पाटील, उपसरपंच डॉ अमित गावडे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर घाडगे, अभिजित जगताप, सुनील बापू मदने, योगेश भागवत , पप्पू जगताप,काळेश्वर ढोबळे, आदी उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!