गोखळी (प्रतिनिधी ) :
फलटण तालुक्यातील युवा तरूण नेतृत्व महादेव गायकवाड कामगार संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, व आझाद समाज पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष, यांनी स्वताचा वाढदिवस रद्द करूण कोरोना झालेल्या व्यक्तींना अंडी व फळे वाटप केले. कोरोना काळात वाढदिवस साजरा न करता एक हात मदतीचा म्हणून फलटण येथील गोखळी गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोखळी विलगिकरण कक्ष कोविंड सेंटर ला 100 अंडी व फळे वाटप करण्यात आली कोरोना झालेल्या लोंकाना योग्य असा सकस आहार मिळावा या साठी वाढदिवसाला होणार्या पैशामधून अंडी फळे वाटप करण्यात आले, अशा प्रकारे कोवीड काळात जर सर्व तरूण वर्गाने वाढदिवस करण्या पेक्षा मदत केली तर नक्कीच कोवीड दुर होऊ शकतो महादेव गायकवाड यांचे कार्य पाहता ग्रामपंचायत गोखळी यांच्या वतीने महादेव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.त्या वेळेस उपस्थित त्यांचे सहकारी मित्र सचिन माने, हेमंत शिरतोडे, आदित्य साळवे, प्रशांत डांगे, साहिल इनामदार, शुभम जाधव ,अक्षय भांडलकर, व ग्रामपंचायत गोखळी येथील कार्यकर्ते उपस्थित होते.