कोरोनातील दुसरा जागतिक पर्यावरण दिना निमित्त निसर्गाशी बोला: डॉ महेश गायकवाड

स्थानिक  व ऑक्सिजन देणारी झाडे लावा ,परदेशी झाडे लावू नका 

जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा 
आपल्या देश्यात पर्यावरणीय बुद्धांक विकसित झाल्याशिवाय जागतिक पर्यावरण दिन साजरे करणे म्हणजे एखादा इवेंट साजरा करण्यासारखे असेल. अगदी याच दिवशी जास्त प्रदूषण होत असते, मात्र कोरोना काळात दुसरा पर्यावरण दिन साजरा करताना परदेशी झाडे लावू नका तर देशी झाडे व ऑक्सिजन जास्त देणारी झाडे लावा असा सल्ला 
 पर्यावरण तज्ञ डॉ महेश गायकवाड यांनी केले 
पर्यावरण दीना निमित्त आयोजित निसर्ग प्रेमी मंडळ च्या सभासदांना ऑन लाइन मार्गदर्शन चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सर्प मित्र अमोल जाधव,पर्यावर मित्र दादा चव्हाण,राहुल शिंदे ,श्री मांढरे आदी ऑनलाइन चर्चेत उपस्तीत होते.
आता आपण निसर्गाशी बोलायला शिकलो तरच कळेल कि, निसर्गाच्या मनात काय चालले आहे.
 महत्वाचे म्हणजे आपल्याला पर्यावरण म्हणजे काय हे समजत नाही याचा स्वीकार केला पाहिजे. . आपल्या अवतीभोवती निसर्ग अत्यंत हळुवारपणे बदल घडवीत असतो. हे बदल निरीक्षणातून समजून घेणे गरजेचे आहे.
आपल्या घराभोवती जर स्थानिक वनस्पतीची लागवड केल्यास, आपण परिसरातील झाड, झुडपे, गवत, वेली स्थानिक जातींचे लावल्यास, निसर्गातील झाडांचे मित्र सोबतीला येतात. यात कीटक, पक्षी, फुलपाखरे, मुंग्या, सरडे, आपन लावलेल्या हिरवळीत येतात. हळूहळू आपल्या संसारात त्यांचाही संसार हळुवारपणे सुरु होतो. आपण लावलेल्या झाडांच्या पानावर फुलपाखरांची अंडी, फांद्यात पक्षांची घरटी, फांद्यांमध्ये पक्षांचा किलबिलाट, सरड्याची धावपळ, फुलांवर मधमाश्या व भुंग्यांची गुणगुण, अधूनमधून शिकारी पक्षांची झाडाझडती असे कित्येक प्रसंग आपल्याला अनुभवायला मिळतात वन्यजीव स्थानिक झाडांना बघून येत असतात म्हणून स्थानिक झाडे सर्वत्र लावा परदेशी झाडे लावू नका 
स्थानिक  झाडात काटेरी बोरी, बाभळी, खैर, खेजडी, शमी, रुई, तरवड, कडुलिंब, करंज, भोकर, गोदन, काटेसावर, पळस, पांगारा, आपटा, शेवगा, हादगा, पिंपळ, नांदृक, उंबर, चिंच, आंबा, बहावा, बेल, आवळा, पारिजातक, अर्जुन, हिवर,बिबा, मोहा, चंदन, सीताअशोक,  टेंबुर्णी, तुळस, गुळवेल, बेहडा, जांभूळ, वावळ, रक्तचंदन, वावळ अशी विविध स्थानिक झाड लावली पाहिजेत.
निसर्गात कुठेही कचरा टाकू नये, हि बाब मनात रुजली पाहिजे. नदीला आई मानून तिचे रक्षण केले पाहिजे. पाणवठे, ओढे, जुन्या विहारी मध्ये कचरा टाकू नये, त्यांचे पवित्र जपावे. पर्यावरण पूरक जीवनशैली जगावी, फटाकेविरहीत जीवन असावे. कमीतकमी घरे, गाड्या आपल्या जीवनात असाव्यात. कमीतकमी संख्यात्मक कपडे असावीत, कारण प्लास्टिक व थर्माकोल च्या पटीत आता आपण दररोज वापरत असलेल्या कपड्यांचा कचरा वाढत चालला आहे. महात्मा गांधींच्या विचारानुसार निसर्ग आपली गरज भागवू शकतो, हाव नाही. हे वेळीच मानवाने लक्षात घेतले पाहिजे.  
 आपल्या आयुष्यात किमान एकतरी स्थानिक झाड लावून त्याचे संरक्षण करा  असा ही सल्ला 
डॉ महेश गायकवाड,यांनी ऑनलाइन चर्चेत दिला.
आभार राहुल सीतापे यांनी मानले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!