फलटण दि. 03 : फलटण नगर परिषद, फलटण संचलीत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, फलटण यांच्या सहाय्याने प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेवक श्री.किशोरसिंह नाईक निंबाळकर (भैय्या), नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, मुख्याधिकारी श्री.संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे दुसऱ्या टप्प्यात सुमारे १११ नागरिकांच्या RT-PCR टेस्ट श्री काळभैरवनाथ मंदिर, भैरोबा गल्ली, फलटण व ओंकार अपार्टमेंट, कसबा पेठ (ब्राह्मण गल्ली), फलटण येथे घेण्यात आल्या.
भैरोबा गल्ली व कसबा पेठ (ब्राह्मण गल्ली) परिसरात हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरास अँड.अशोकराव जाधव, मा.उपनगराध्यक्ष संजय पालकर, शिवाजीराव घोरपडे, किशोर देशपांडे, जगन्नाथ पवार, चंद्रकांत पवार, प्रदीप पवार, अविनाश पवार, अनिरुद्ध रानडे, रामभाऊ पवार, भाऊ कापसे, गोरख पवार, सचिन कुलकर्णी विशाल पवार, महेश पवार, सचिन तिवाटणे, प्रणव चमचे, सुहास निंबाळकर, पोपट बर्गे, सुजीत कापसे, अवधूत कदम, गजानन देशपांडे, सुनिल दाणी, मयूर हिरणवाळे, सतिश पाटणे, नामदेव चव्हाण, सुषमा सबनीस, तेजसिंह इंगळे, योगेश हिरणवाळे, ओंकार जेबले, नंतजीत हिरणवाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शितल सोनवलकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रशांत बनकर, प्रयोगशाळा सहाय्यक शंकर जाधव, ऋषी कर्वे, आरोग्यसेविका सारिका धायगुडे, आशा गटप्रवर्तक स्वाती भिवरकर, किर्ती भिंगे (आशाताई), आस्मा आत्तार (आशा) यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतला.