जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
कोरोना च्या महामारीत सुद्धा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला जाऊन त्यांच्या घरातील साप पकडणे व त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचे धाडसी काम सर्प मित्र करतात याबद्दल व सर्पमित्रांचा तर कोरोनाच्या काळात सेवा निवृत्ती झालेले शिक्षक व एक जून रोजी वाढदिवस असलेले रहिवासी आदी चा सत्कार देसाई इस्टेट मधील श्री गणेश तरुण मंडळ व श्री छत्रपती राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आला.
सर्पमित्र अमोल जाधव ,
सेवा निवृत्ती निमित्त प्रा शामराव मोहिते सर (फुले एज्युकेशन सोसायटी भवानी नगर) तर वाढदिवस निमित्त
प्रा बापूराव जगदाळे सर, (फुले एज्युकेशन सोसायटी भवानी नगर)
सोनवणे सर, (निवृत्त शिक्षक MES हायस्कुल)
पांडुरंग पवार (कामगार नेते युनायटेड स्पिरीट पिंपळी)
अर्जुनराव काळे (व्यवस्थापक बारामती बँक)
जनार्दन पोतदार (प्रसिद्ध उद्योजक पोतदार सेल्स)
डॉ ज्ञानेशवर घुले (पशुवैदकिय अधिकारी)
उद्योजक, अनिल खंडाळे
आदी चा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी नगरसेवक अतुल बालगुडे,हेमंत भाऊ नवसारे,राहुल वायसे, संग्राम खंडागळे,निलेश पवार,साहिल शेख,यश बामणे, सुनील कदम,सुशील जगताप,अमोल पवार, आदी उपस्तीत होते
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक जून चे औचित्य साधून विविध क्षेत्रात योगदान दिलेले व देसाई इस्टेट चे रहिवासी असलेले नागरिकांचा घरी जाऊन सन्मान करून त्यांच्या कार्यास प्रोत्साहित केले ‘असल्याचे आयोजक नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले
हेमंत नवसारे यांनी आभार मानले राहुल वायसे यांनी स्वागत केले