बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा (जिमाका) 3:- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यामार्फत 7, 8,9 व 10 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात बेरोजगार उमेदवारांनी https:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 02162-2339938 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेलवर आयडीवर संपर्क साधावा.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!