गोखळी येथील कोरोना विलिनीकरण कक्ष कोरोणा बाधीत रुग्णांना कोरोना मुक्त होण्यासाठी पोषक वातावरणात उभारणी कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन पारनेर चे आमदार निलेश लंके यांनी केले.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील कोरोना विलिनीकरण कक्षास आज पारनेर (अहमदनगर)चे आमदार निलेश लंके यांनी भेट दिली.कोरोना विलिनीकरण कक्षात थेट प्रवेश करून कोरोना बाधीत रुग्णांची भेट घेतली त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून आधार धीर दिला.कक्षातील रूग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा बद्दल चौकशी करून कोणतेही अनुदान न घेता लोकसहभागातून चालविलेल्या कोरोना विलिनीकरण कक्ष इतर ग्रामस्थांना अनुकरणीय आहे.याबद्दल गोखळी करांचे अभिनंदन केले.कोरोना कक्षातील रूग्णांना देण्यात येणाऱ्या काढण्याचा आस्वाद घेतला.
यावेळी आमदार निलेश लंके यांचे हस्ते विलिनीकरण कक्षातील कोरोना मुक्त रुग्णांना झाडं देऊन निरोप देण्यात आला.
त्यांच्या समवेत आयुर उद्योगाचे प्रमुख दिगंबर आगवणे होते.
कोरोना विलिनीकरण कक्षा बदल सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी माहिती दिली.गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांनी झाडं देऊन आ.निलेश लंके यांचे स्वागत केले.विलगिकरण कक्षातील रूग्णांना दररोज चहा नाष्टा देणारे दीपक चव्हाण यांचा झाडं देऊन निलेश लंके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष सागर गावडे पाटील, पोलिस पाटील विकास शिंदे, उपसरपंच डॉ अमित गावडे, रमेश गावडे,. सुनील बापू मदने, हनुमान दहिहंडी संघाचे अध्यक्ष योगेश भागवत, माजी उपसरपंच ज्ञानदेव घाडगे,अभि जगताप, राजेंद्र भागवत, शेखर लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.