रुई जळोची ओढ्याची स्वछता मोहीम करताना नगरपरिषद पदाधिकारी व श्रायबर डायनॅमिक्स कंपनीचे अधीकारी (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
रुई ते जळोची मधील ओढ्याचे खोलीकरण,रुंदीकरण व स्वछता मोहीम श्रायबर डायनॅमिक्स कंपनीच्या वतीने करण्याचा शुभारंभ मंगळवार 1 जून रोजी करण्यात आला. या वेळी नगरपरिषद चे उपनगराध्यक्ष अभिजित जाधव , गटनेते सचिन सातव,नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे,बांधकाम व्यवसाईक उद्धव गावडे व शहर राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष नवनाथ चौधर व श्रायबर डायनॅमिक्स कंपनीचे अधिकारी हेमंत चव्हाण,मानसिंग मांडे, अंकुश दरेकर आदी मान्यवर उपस्तीत होते .बारामती नगरपरिषद हद्दी मधील सर्वात मोठा सदर ओढा असून रुई व जळोची या दोन गावांच्या हद्दी मधून हा ओढा जात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात जलपर्णी व गाळ साचून नागरिकांना त्रास होतो म्हणून स्वछता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सदर ओढा स्वच्छ कंपनीच्या वतीने सामाजिक बांधीलकी म्हणून सण 2020 व 2021 मध्ये बारामती नगरपरिषद ला स्वच्छ करून देण्यात येत असल्याचे कंपनीचे रिजनल ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र जाधव यांनी सांगितले.