बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
गर्भवती महिला फलटण तालुक्यातील असून ९ महिने पूर्ण झाले असताना कोरोना सारखा आजार त्यांना जडला त्यांना पहिले काही दिवस त्रास झाला नाही. परंतु नंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. HRCT स्कोर हा जवळपास 13 होता , SPo2 लेव्हल ९५ च्या खाली त्यामुळे काळजी अधिक वाढली. श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर चे संचालक डॉ. आशिष जळक आणि त्यांच्या टीम ने बाळ आणि आई यांना सुखरूप या संकटातून बाहेर काढले.
गरोदर असणे म्हणजे बाळ आणि आई या दोघांनाही ९ महिने काळजी करण्याचे काम.अशा मध्येच जर गर्भवतीला कोरोना सारखा महाभयंकर आजार झाला तर अधिक काळजी वाढते. तेव्हा कोणत्या डॉक्टर कडे जावे, काय करावे हे सुचत नाही. पण बारामती मधील श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर मध्ये योग्य मार्गदर्शन करण्यात आले
कोरोनासारख्या आजारासाठी गरोदर महिलांना कोणतीही कोरोना लस उपलब्ध नाही पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीम ने योग्य उपचारांच्या मदतीने सर्व गरोदर महिलांना या संकटापासून वाचवण्याचे काम केले