उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर रुग्णालयास देताना सोबत पियाजो चे अधिकारी (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी येथील पियाजो व्हेईकिल्स प्रा ली यांच्या वतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर बारामती मधील रुग्णालयात ऑक्सिजन ची टंचाई होत असल्याने सामाजिक बांधिलकी जपत शनिवार 29 मे रोजी विद्या प्रतिष्ठान येथील कार्यक्रमात
10 ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भेट देण्यात आले
सदर उपक्रमा साठी पियाजो व्हेईकल्स च्या एच आर प्रमुख पूजा बन्सल यांनी मार्गदर्शन केले
या प्रसंगी पियाजो व्हेईकिल्स बारामती प्लांट चे जनरल मॅनेजर किरणकुमार चौधरी,एच आर मॅनेजर चंद्रकांत काळे,सी एस आर मॅनेजर योगेश कापसे व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,डॉ सदानंद काळे,डॉ बापुसाहेब भोई,डॉ मनोज खोमणे ,डॉ चंद्रकांत म्हसकर व नगरपरिषद चे गटनेते सचिन सातव,राष्ट्रवादी चे तालुकाअध्यक्ष संभाजी होळकर व इतर मान्यवर उपस्तीत होते
कोरोनाच्या महामारीत पियाजो ने केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले