सातारा दि. 31 (जिमाका): कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी अशा बालकांबाबतची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सातारा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, सातारा दूरध्वनी क्रमांक 02162-237353 यावर तसेच बाल कल्याण समिती सातारा चाईल्ड हेल्प लाईन 1098 वर देण्यात यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.
जिल्हा बाल संरक्षण , सातारा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, सातारा यांच्या दूरध्वनी क्रमांक 02162-237353 व चाईल्ड हेल्प लाईन 1098 वर 11 कॉल्स आले असून त्यामध्ये सर्व बालकांचे वडील कोविड-19 मुळे मृत्यु पावलेले आहेत. त्या सर्व बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याबाबत बाल कल्याण समिती, सातारा यांना शिफारस करण्यात आलेली असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी कळविले आहे.