सातारा (जिमाका) 31:-कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधांचा वापर करुन त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ तयार करावे या करिता जिल्ह्यामध्ये 2021-22 साठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी https://forms.gle/