वाठार निंबाळकर दि. 30 :
वाठार निंबाळकर गावातील 7मे पासून सुरु झालेल्या विलगीकरण कक्षाला फलटण तालुक्याचे युवा नेतृत्व व वाठार निंबाळकर पंचायत समिती गणाचे कार्यक्षम सदस्य *मा. श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाळराजे)* यांनी सदिच्छा भेट देऊन कोरोना रूग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. विलगीकरण कक्षाला लागेल त्या गोष्टीचे सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. विलगीकरण कक्षातील रुग्णाला दोन वेळा नाष्टा,दोन वेळचे जेवण तसेच, वैयक्तिक वैद्यकीय सुविधा देवून देखभाल केली जाते व तेथील स्वच्छता ही अतिशय उत्कृष्ट असल्याचे दिसून आले. हे सर्व लोकसहभागातून झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे वाठार निंबाळकर येथील तरुण कार्यकर्ते, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, ग्रामस्थ यांचे कौतुक केले.तसेच आतापर्यंत या विलगीकरण कक्षात 50 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेवून पूर्ण बरे झाल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना काळात ही गावोगावी श्रीमंत विश्वजीतराजे भेट देत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
मा.श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या भेटी वेळी वाठार निंबाळकर गावचे कर्तव्यदक्ष तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार नाळे,वाठार निंबाळकर गावचे मा. सरपंच मा.श्री.अशोकराव निंबाळकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटणचे तालुकाध्यक्ष मा.अभिजित निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते
मा.श्री प्रकाश तरटे,मा.श्री.रूपेश नेरकर, मा.श्री.अमृत निंबाळकर इ.मान्यवर तसेच कोविड विलगीकरण कक्षातील स्टाफ उपस्थितीत होते.