सातारा दि.31 (जि.मा.का): सध्याची तरुण पिढी ही तंबाखूच्या व धूम्रपानाच्या आहारी जाताना दिसत आहे. यावर्षी जागतिक आरोगय संघटनेने दिलेली ” तंबाखू सोडवण्यासाठी वचनबध्द राहा व प्रतिज्ञा करा ” अशी तंबाखू विरोधी दिनाची शपथ क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात देण्यात आली.
यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वारंवार तोंड येणे, हिरडयातून रक्त किंवा पू येणे, न दुखणारा व 3 आठवडयांपेक्षा जास्त काळ राहणारा तोंडामध्ये वण्र पांढरा किंवा लाल चट्टा, जबडयाखाली व मानेवर कडक गाठ, तोंड उघडण्यास त्रास होणे, तोंडामध्ये कॉलीफलावर सारखी पेशींची वाढ दिसणे इत्यादीसारखी तोंडामध्ये लक्षणे आढळून आल्यास त्वरीत दंत शल्य चिकित्सकाकडून तपासणी करुन घ्यावी. जिल्हा रुग्णालयामधील दंत विभागात डॉ. योगिता शाह, डॉ. कोमल निंबाळकर यांच्याकडून तपासणी करुन घ्यावी, असे डॉ. विजया जगताप जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय सातारा यांनी सांगितले.