बारामती : ( फलटण टुडे वृत्तसेवा )
बारामती येथील जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन व साई समर्थ डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना पश्चात रुग्णांच्या म्युकरमायकोसिस च्या लवकर निदानासाठी मोफत दंत व मौखिक आरोग्य तपासणी शिबीर दिनांक 31 मे 2021 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत , साई समर्थ डेंटल क्लीनिक , भिगवण चौक याठिकाणी आयोजित केली आहे.
वाढत्या म्युकरमायकोसिस च्या पार्श्वभूमीवर कोरोना पश्चात या रोगावर लवकर निदान हे रुग्णाच्या पुढील आयुष्यासाठी आवश्यक आहे , त्यासाठी सदर शिबिराचे आयोजन केल्याचे डॉ निलेश महाजन यांनी सांगितले.
रुग्णांना जर दातदुखी, हिरड्यातून रक्त येने , जबडा दुखणे, तोंडामध्ये चट्टे पडणे, चावता ना येणे किंवा इतर लक्षणे असतील तर त्यांनी आपली दंत व मौखिक आरोग्य तपासणी करून घ्यावी, यामुळे जर कोणाला म्युकरमायकोसिस चे लक्षण असतील तर त्याचे लवकर निदान होऊन त्याचे उपचार लवकर होऊ शकतील, असे आवाहन दंत वैद्यक तज्ज्ञ डॉ प्रशांत खरात यांनी केले आहे. कोरोनाचे नियम पाळण्यात यावे यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे,त्यासाठी 9665823103 या नंबरवर संपर्क करावा .