फलटण दि. 27:
कोरोनाच्या महामारीने एकीकडे हाहाकार माजलेला आहे फलटण तालुक्यातील जनतेसाठी सुसज्ज कोरोना केअर सेंटरची गरज पहाता फलटण तालुक्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या कल्पनेतून ढवळपाटी (रामराजे नगर) ता फलटण येथे 30 मे रोजी 100 बेडचे सुसज्ज कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन होणार आहे.
मागील वर्षांपासून कोरोना च्या काळात कोरोना योद्धा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण तालुक्यात अखंडपणे काम करत आहे. रुग्णांना नाष्टा जेवण, मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप, रुग्णवाहिका सेवा, ऑक्सिजन सेवा, हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मदत, मास्क व सॅनिटायझर वाटप, शिवशाही भोजन, गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप, परराज्यातील लोकांना प्रवासासाठी मदत, भटक्या मुक्या प्राण्यांना अन्नदान अशा कित्येक सेवा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत राबविण्यात आल्या आहेत.
शेतकरी, व्यापारी ,हमाल, अडतदारांची काळजी घेत कोरोना नियमांचे पालन करत आजअखेर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मूळ हितासाठी कटिबद्ध असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील अशी एकमेव बाजार समिती आहे की जी कोरोनाच्या साध्यस्थीतीत आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व गरीब जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटर उभारत आहे.
सामाजिक सेवेचा वसा पिढ्यानपिढ्या जपणाऱ्या नाईक निंबाळकर या राजे कुटुंबातील सर्व सदस्यांनी
मागील वर्षीपासून कोरोना काळात फलटण तालुक्यातील जनतेसाठी दिवसरात्र सेवेसाठी घालवली असून आजही ही सेवा वय पैसा वेळ या कोणत्याही प्रकारच्या गोष्टींकडे न बघता सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून फलटण तालुक्यातील एकही नागरिक कोरोना उपचारासाठी वंचित राहू नये म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे तालुक्यातील सर्वच भागात विविध ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारत आहे. आमदार दीपक चव्हाण यांचीही मोलाची साथ मिळत आहे. सामान्यातला सामान्य व गरिबातील गरीब शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना या कोरोना च्या कठीण प्रसंगी योग्य उपचार मिळावेत यासाठी ढवळपाटी (रामराजे नगर) ता. फलटण याठिकाणी 100 बेडचे सुसज्ज कोरोना केअर सेंटर उभारण्यात येत असून दिनांक 30 रोजी ते सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे.
नव्याने सुरू होऊ घातलेल्या कोरोना केअर सेंटरच्या ठिकाणाची पाहणी गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांनी केली यावेळी ग्राम विकास अधिकारी डी जी ननावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, कृषी उत्पन्न बाजार समिती आरोग्य समिती समन्वयक विजय भिसे काशिनाथ ढवळे, पोलीस पाटील, रामभाऊ ढोक ग्रामसेवक ढवळ , प्रशांत रणपिसे ग्रामसेवक वाखरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोना केअर सेंटरच्या
पाहणीनंतर गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांच्या हस्ते पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना फेसशिल्डचे वाटप करण्यात आले.