वाखरी ता. फलटण येथील कोरोना योद्धे यांना प्रोत्साहन भत्ता रणजित तांबे यांच्या वतीने देण्यात आला असून यावेळी कोरोना सेंटर मधील रुग्णांना पाच बेड, औषधे व अंडी देण्याचे तांबे यांनी जाहीर केले असून त्यांनी केलेल्या मदतीमुळे कोरोना काळात कोरोना योद्धे यांचे मनोबल वाढले आहे.
वाखरी गावातील पोलिस पाटील, दोन आशा स्वयंसेविका , सहा अंगणवाडी सेविका व मदतनीस , तीन ग्रामपंचायत कर्मचारी अशा एकूण 12 कोरोना योद्धे यांना रणजित तांबे यांचेकडून स्वखर्चाने प्रत्येकी दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात आला व कोरोना सेंटरला ५ बेड,कोरोना सेंटर मधील रुग्णांना रोजची औषधे,रोज सकाळ संध्याकाळी अंडी,गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्याचे रणजित तांबे यांनी जाहीर केले.
हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षाच्या परिसरात पार पडला. याप्रसंगी डॉ. शरद मोहिते , अमित गायकवाड , यशवंत तांबे , अनुप गायकवाड , संतोष गरड , दत्तात्रय मोहिते , किसन मोहिते , सोमनाथ कुंभार , सर्व कोविड योद्धे व ग्रामस्थ उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय मोहिते यांनी केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल रणजित तांबे यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.