सातारा दि. 27 (जिमाका) : कोविड-19 आजाराच्या दुसऱ्या लाटेमध्ये बहुतांश खाजगी व शासकीय आरोग्य संस्थेतील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रॅट चाचणी डाटा वेळेत भरण्यात आलेला नाही. त्यामुळे दि. 24 व 25 मे 2021 रोजी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या विशेष निवड समितीने जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय रॅट चाचणी केंद्रास भेट दिली असता रॅट चाचणी केंद्रात काही त्रुटी आढळुन आल्या आहेत. व दोन लॅब्स जिल्हा प्रशासनाने तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत व तीन लॅब्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे सर्व लॅब्सनी मागील काही दिवसामाध्ये सर्व टेस्टची नोंद ऑनलाईन पोर्टलवर केली असून त्यात नवीन व जुने नोंदी समाविष्ठ आहेत.
शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये सर्वत्र शासकीय आणि खाजगी चाचणी केंद्रात रॅट चाचणी (RAT) सुरु करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन रुग्णांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार वेळेत होऊन मृत्यूच्या संख्येत घट होण्यासाठी या रॅट चाचणीची महत्वाची भूमिका आहे. जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णाले तसेच जिल्हा रुग्णालये या ठिकाणी रॅट चाचणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 59 खाजगी लॅब्स, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोवड हॉस्पिटल येथे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली (MBBS अर्हता धारक) रॅट चाचणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यांना दैनंदिन ऑनलाईन आयसीएमआर पोर्टल अपडेट करण्या संदर्भातच्या सूचना तोंडी व लेखी वेळोवळी देण्यात आलेल्या आहेत. तसेच गंभीर गंभीर त्रुटी असणाऱ्या लॅब्सवर कडक कारवाईचा ईशारा दिला आहे.
त्यांची नावे कळू शकतील काय
नाही