जळोची येथे बुध्द पौर्णिमा उत्साहात साजरी

जळोची येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त मार्गदर्शन करताना मान्यवर
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा 
जळोची भिमनगर समाज मंदीर येथे बुध्द पौर्णिमे निमित्त  बुध्द वंदनेचा कार्यक्रम पार पडला. बुधवार 26 मे रोजी सकाळी 9 वाजता बुद्धपुजा व सामुहिक बुध्दवंदना घेण्यात आली.त्रिसरण पंचशिल ग्रहण करुण अभिवादन करण्यात आले. 
    यावेळी बुद्ध विचार  प्रशांत कांबळे यांनी  सांगीतले भगवान बुध्दांचे विचार जिवनात आत्मसात केले तर चांगले जिवन जगण्याचा मार्ग  मिळेल  दु:ख मुक्तीतून मार्ग काढायचा असेल तर बुध्दांच्या शांततेच्या मार्गाशिवाय तोरणापाय नाही असे सांगीतले.
      यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे,मोहन काबळे,शंकर कांबळे,प्रशांत कांबळे,प्रविण कांबळे,विकी कांबळे,शैलेश बगाडे,आनंद लोंढे,शुभम कांबळे,आदर्श कांबळे,चेतन कांबळे,निलेश कांबळे,विशाल कांबळे,पोपट गायकवाड,संजय लोंढे
तसेच परिसरातील महिला व समाज बांधव उपस्थित होते.तसेच शंकर कांबळे यांनी उपस्थितांना खीरदान वाटप केले.
     सदर कार्यक्रमाचे आयोजन बौध्द युवक संघटना जळोची यांच्या वतीने करण्यात आले होते.कोरोनाच्या नियमाचे पालन करत सदर कार्यक्रम संपन्न झाला.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!