योग प्रात्याक्षिक दाखविताना विद्यार्थी
बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
‘आयुष मंत्रालय भारत सरकार’ आणि ‘कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया’ यांच्या सहयोगाने आणि वसुंधरा वाहिनीच्या वतीने ‘आरोग्यासाठी योग’ हा उपक्रम एप्रिल महिन्या पासून राबवला जात आहे. या ऑनलाईन कोर्सचा लाभ सर्वाना विनाशुल्क घेता येत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभावना दिसत आहे. त्याला तोंड देण्यासाठी सदृढ आरोग्याचे राखायचे असेल तर आपली जीवन शैली, बदलली पाहिजे. प्रतीकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार विहार आणि नियमित योगासाने यांचा अंगीकार आपल्याला कोरोनाशी लढण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ.सुनेत्रा पवार व सचिव अॅड. नीलिमा गुजर यांनी केले.
मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा ही भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे.
लोकांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने योगाचे सखोल ज्ञान देऊन ऑनलाईन सराव करून घेणे आणि समाजास योगाभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून विद्याप्रतिष्ठानच्या सर्व विश्वस्त मंडळांनी या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले आहे वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख सौ आशा मोरे यांनी सांगितले. एप्रिल महिन्या पासून सुरु असलेल्या या उपक्रमाद्वारे असख्य लोक या उपक्रमाद्वारेयोगाभ्यास करू लागले आहेत. जेणेकरून २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा करताना योग्य प्रकारे योगासने करू शकतील. आयुष मंत्रालय भारत सरकार आरोग्यासाठी योग हा अशा पद्धतीचा उपक्रम कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रथमच राबवत आहे असे वसुंधरा वाहिनीच्या केंद्रप्रमुख सौ आशा मोरे यांनी सांगितले.
या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन विद्याप्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजीचे डायरेक्टर डॉ सतीशचंद्र जोशी व रजिस्ट्रार श्री. संजय जगताप यांनी केले. या उपक्रमासाठी निवेदक स्नेहल कदम व ऋतुजा आगम यांनी परिश्रम घेतले.
या . विनाशुल्क कोर्ससाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. तरी इच्छुकांनी वसुंधरा वहिनी शी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे.