वाठार निंबाळकर :
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य समूहाची 10 एप्रिल 2020 रोजी स्थापना झाली असून या समूहा अंतर्गत वाचन संस्कृती वाढावी व ती जोपासली जावी यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये दर महिन्याला पुस्तक वाचन करून त्याचे परीक्षण करून पाठवणाऱ्या सदस्यांचे लकी ड्रॉद्वारे क्रमांक काढून दर महिन्याला 5 विजेत्यांना पोस्टाने पुस्तके पाठवली जातात. तसेच वाचन साखळी समूह सदस्य यांच्या वाढदिवसालाही त्यांना भेट म्हणून पुस्तके दिली जातात.यात अट एकच असते की मिळालेले पुस्तक वाचन करून वाचनसाखळी समूह ग्रुपवरती ते शेअर करावे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मत वाचन साखळी समूहाच्या संयोजिका श्रीमती.प्रतिभा लोखंडे व श्रीमती.प्रतिभा टेमकर यांनी व्यक्त केले.
आज घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण 1101
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्व प्रश्न बरोबर असणारे प्रत्येक जिल्हा नुसार स्पर्धकातून लकी ड्रॉद्वारे काढण्यात आलेले यशस्वी स्पर्धक व त्यांचे क्रमांक पुढील प्रमाणेआहेत.स्पर्धेतील प्रचंड प्रतिसाद विचारत घेता बक्षीस संख्या 5 ऐवजी 15 करण्यात आली आहे प्रथम क्रमांक तीन काढण्यात आले त्यामध्ये,
परमेश्वरी रायजीप्रभू शेलोटकर अमरावती,भूषण विक्रम रांजवे -बीड,आदित्य बनसोडे -सातारा
द्वितीय क्रमांक तीन काढण्यात आले, महावीर आलमने
रत्नागिरी ,समृद्धी अविनाश गोरे
औरंगाबाद ,मानसी मराठे – पुणे
तृतीय क्रमांक तीन काढण्यात आले.मानसी प्रेमानंद मेलगिरी सोलापूर, सुमीत गुरुनाथ कडके
– लातूर ,गौरव रंगनाथ गांगुर्डे नाशिक व उत्तेजनार्थ सहा क्रमांक काढण्यात आले.प्रीतम संतोषकुमार राठोड
-अहमदनगर,अथर्व मालेवार – परभणी ,जाईद मकसूद पटेल
-मुंबई ,सानिया जुनघरे – नागपूर,
मसिरा रियाज आष्टेकर
सांगली,वेदांत नरुटे – सातारा या यशस्वी स्पर्धकांना बक्षीसाचे स्वरूप पुढील प्रमाणे होते.प्रथम क्रमांक 300 रुपयांचे पुस्तक व प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक 200 रुपयांचे पुस्तक व प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक 100 रुपयांचे पुस्तक व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ क्रमांक100 रुपयांचे पुस्तक व प्रमाणपत्र
असे एकूण 15 बक्षिसे देण्यात आली आहेत.बक्षीस प्रायोजक श्री.योगेश आहेर सर हे होते, त्याच बरोबर वाढीव बक्षीस प्रायोजक म्हणून वाचनसाखळी समूहाच्या संयोजिका श्रीमती.प्रतिभा लोखंडे व श्रीमती प्रतिभा टेमकर मॅडम यांनी केले.
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य या समूहातील सर्व सदस्य स्वतः या सर्व स्पर्धेचा खर्च करून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्यातील जवळपास 80% जिल्ह्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आणि वाचनसाखळी समूहाचे संपूर्ण राज्यभर कौतुक होत आहे.
सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी समूहाचे संयोजिका श्रीमती.प्रतिभा लोखंडे व श्रीमती प्रतिभा टेमकर तसेच प्रश्नमंजुषा संयोजक सदस्य ,श्री.गणेश तांबे,
श्री.योगेश आहेर,श्री. लक्ष्मण चिमले, श्रीमती अनुजा चव्हाण श्री.कचरू चांभारे,श्रीमती पूनम गुजर, श्रीमती.नीता खोत,
श्रीमती.दिपाली जोशी,
श्री.बालासाहेब बिरादार,
श्रीमती.ज्योती कोहळे, श्रीमती वैशाली सबादे, श्रीमती विद्युल्लता पवार, श्रीमती विजया लिलके
श्रीमती.दिपाली जोशी,
श्री.बालासाहेब बिरादार,
श्रीमती.ज्योती कोहळे, श्रीमती वैशाली सबादे, श्रीमती विद्युल्लता पवार, श्रीमती विजया लिलके
मार्गदर्शक डॉ.लीना निकम तसेच वाचनसाखळी समूह व्हाट्सअप ग्रुप या सर्वांचे सहकार्य मिळाले.