आसू (सुरेंद्र फाळके ) :
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात जाऊन कोरोना ग्रामदक्षता समितीबरोबर बैठक घेत ग्रामीण भागातील कोरोना विलगीकरण कक्षाला भेटी दिल्या. फलटण तालुक्यातील साठे फाटा गोखळी तसेच आसू येथील जिल्हा प्राथमिक शाळेत असलेल्या कोरोना विलगीकरण कक्षाला भेट देऊन कोरणा दक्षता कमिटीला शासकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ग्रामीण भागातील कोरोना ची साखळी तोडण्यासाठी आसू परिसरातील सर्व सुज्ञ नागरिकांनी सहकार्य करावे व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करावे असे प्रतिपादन फलटणचे प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी केले यावे.
तसेच आसू ग्रामस्थांनी आपल्याला कोरोना चे लक्षणे दिसल्यास लगेच कोरोनाची टेस्ट करावी व जिल्हा प्राथमिक शाळेत उभारलेल्या विलगीकरण कक्षात दाखल व्हावे यामुळे आपल्या कुटुंबातील लोकांना कोरोना ची लागण होणार नाही तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार द्यावा व योग्य उपचार घेताच कोरोना मुक्त होऊन विलगीकरण कक्षातून घरी जावे असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी केले.
यावेळी फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, फलटणचे तहसिलदार समीर यादव, प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप, डीवायएसपी तानाजी बर्डे, गटविकास अधिकारी अमिता गावडे, आसू गावचे सरपंच महादेवराव सकुंडे, उपसरपंच धनंजय घोरपडे, विशालसिंह माने पाटील, पोलीस पाटील अशोकराव गोडसे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव माने पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
आसू गावातील दुकानदारांनी नियमांचे पालन करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे अन्यथा नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– उपसरपंच धनंजय घोरपडे