कर्जतच्या ८ महिन्याच्या अतिगंभीर गर्भवतीचे प्राण वाचवण्यात बारामती मधील डॉक्टरांना यश.

रुग्णाचे नातेवाईक माहिती सांगताना व इनसेन्ट मध्ये डॉ आशिष जळक
बारामती:
 गर्भवती महिला कर्जत या गावाची होती. या गर्भवतीच्या पोटामध्ये ८ महिन्यांचे बाळ होते, पोटामध्ये अचानक झालेला रक्तस्त्राव यामुळे तिची रक्ताची पातळी (HB ची पातळी) ४ वरती आली, प्लेटलेट, WBC सर्व कमी झालेले असताना प्राण जाण्याच्या अवस्थेत असणाऱ्या गर्भवतीचे प्राण वाचवण्यात मा. आमदार रोहितदादा पवार आणि बारामतीच्या डॉक्टरांच्या टीम ला यश आले.   

लग्नाला १ वर्ष झाले होते गर्भामध्ये ८ महिन्यांचे बाळ होते पण अचानक पोटात दुखू लागले आणि दाम्पत्यांनी कर्जत मधील हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी पहिले महिलेला तज्ञ डॉक्टरांच्या उपचारांची गरज होती. कारण तिची रक्ताची पातळी ही रक्तस्त्राव झाल्याने ४ वरती आली होती. काय करावे हे सुचत नव्हते अशामध्ये त्यांनी मदतीसाठी मा.आमदार रोहीतदादा पवार यांना फोन लावला असता त्यांनी डॉ. आशिष जळक यांच्या श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर मध्ये पेशंट ला योग्य उपचार मिळेल हे सुचवले. आणि  तातडीने तशी तयारी डॉक्टरांना करायला सांगितली. 

मा. सौ. सुनंदाताई पवार यांच्या वेळो वेळी होत असलेल्या चौकशी आणि फोन मुळे पेशंट आणि नातेवाईक यांना धीर मिळाला डॉक्टरांच्या टीम ला योग्य मार्गदर्शन मिळाले. पेशंट ला वेळीच उपचार मिळाल्यामुळे प्राण वाचवण्यास मदत झाली. 

डॉ. आशिष जळक, डॉ. अजित देशमुख आणि भूलतज्ञ डॉ. शशांक शहा यांच्या टीमने सर्व तयारी केली आणि पेशंट ला सुखरूप ठेवण्यात यश आले. आज पेशंट सुटून घरी जात असताना त्यांच्या नातेवाईकांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये ते म्हणाले मा. आमदार रोहितदादा पवार, मा. सौ. सुनंदाताई पवार आणि श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर चे डॉक्टर आणि सर्व स्टाफ यामुळे रविवार दि 23 मे ला सुखरूप  घरी जाऊ शकले 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!