फलटण :
फलटण नगर परिषद, फलटण संचलीत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, फलटण यांच्या सहाय्याने प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर (भैय्या), नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे पहिल्या टप्प्यात सुमारे पन्नास नागरिकांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट श्री माणकेश्वर मंदिर परिसरात करण्यात आल्या.
शुक्रवार पेठेतील शनीनगर व चाँदतारा मस्जिदीच्या मागे असणाऱ्या परिसरात हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरास पै.पप्पू शेख, अभिजीत जानकर, गोरख पवार, जमीर आत्तार, सचिन नाईक, अनिल शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रशांत बनकर, प्रयोगशाळा सहाय्यक शंकर जाधव, आरोग्यसेविका अश्विनी फरांदे, प्रियांका शिंदे, सुरेखा भोईटे (आशाताई) यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतला.