फलटण :
आपण सगळेच कोरोना महामारी च्या जीवघेण्या संकटाला धैर्याने तोंड देत आहोत ,
ICMR च्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून नुकतेच कुठेतरी या महामारी चा सामना करतो ना करतो तोच ,कोरोना आजारात वापरण्यात आलेली स्टिरॉइड्स , अनियंत्रित असणारा मधुमेह , यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना कोरोना पश्चात
म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य.. गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे हा बुरशीजन्य आजार अतिशय घातक आहे यामधे सुमारे ४० ते ८० टक्के मृत्युदर आहे तसेच काही रुग्णांची दृष्टी कायमची जात आहे .तर काही रुग्णांचे नाक व जबड्याचे हाड काढून टाकावे लागत आहे
या रोगाची काही प्राथमिक लक्षणे
१ दात दुखणे
२ दात हालणे
३ हिरड्यांना सूज व पू येणे
४ तोंडाचा घाण वास येणे
५ चेहऱ्यावर , जबड्यावर सूज येणे
६ नाकातून काळा किंवा लालसर द्रव येणे
७ नाक चोंदणे
८ डोळ्याच्या भोवती व टाळूवर काळे चट्टे पडणे
९ ताप येणे
१० डोळे लाल होणे
११ एकच वस्तू दोनदा दिसणे
१२ डोकेदुखी
कोरोना प्रमाणेच याही आजारावर , लवकर निदान आणि लवकर योग्य उपचार.हाच एकमेव पर्याय उपयोगी ठरत आहे वेळीच निदान केले तर आपण या आजाराला नक्कीच प्रतिबंध घालू शकतो म्हणूनच फलटण तालुक्यातील जनतेसाठी
एक सामाजीक बांधीलकी म्हणून.बुधवार दिनांक २६ मे २०२१ रोजी अनंत मंगल कार्यालय कोळकी फलटण.या ठिकाणी दुपारी १ ते ४ या वेळेत
फलटण डॉक्टर्स असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशन बारामती-फलटण शाखा. यांच्या संयुक्त विद्यमाने.मोफत म्युकरमायकोसीस रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
तरी ज्या लोकांना , दिनांक १ एप्रिल या तारखेनंतर कोरोनाची लागण झाली आहे आणि ज्यांना वरील प्रकारची कोणतीही लक्षणे आहेत , तसेच ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे अशा सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती वेळीच निदान व वेळीच उपचार,करू म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराला हद्दपार ज्या रुग्णांना या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे अशा रुग्णांनी खाली दिलेल्या लिंकवर आपली संपूर्ण माहिती भरून मंगळवार दिनांक २५ मे २०२१ सायंकाळी ५ वाजेपर्यंत नावनोंदणी करावी
https://forms.gle/LatvJH41MpU5o3QH6