बारामती:
कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की मनुष्यप्राणी किती हतबल होतो नाही का..??आताच्या घडीलाही जगभरातल्या लोकांची काहीशी अशीच गत झालीये.. त्यातून ही आपत्ती नैसर्गिक आहे की मानवनिर्मित ह्या संशयाने सगळ्यांना ग्रासलेले आहे..
टीव्ही, सोशल मीडिया, मित्रमंडळी ह्यांच्याकडून कित्येक प्रकारची माहिती मिळतीये.. कोण म्हणतो ते खोटे आहे आणि हे खरे आहे..
कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर दुर्लक्ष करावे हे देखील भल्याभल्यांना कळेनासे झालेय.. मनाची – बुद्धीची अवस्था देखील अशीच झालीये..
हे बाहेर चे वादळ कमी होते म्हणून की काय आता बुद्धिमध्येही द्वंद्व सुरू झाले आहे.. आपल्याला हे तर माहीतच आहे की ‘मन चिंती ते वैरीही ना चिंती
किती वर्षे लागतील ह्या गर्तेतून त्यांना बाहेर यायला.. हे देवच जाणे..!
त्यातून भारतीय माणसे तर एकटी राहूच शकत नाहीत.. सण समारंभ, गेट टू गेदर, गप्पा टप्पा ह्यांच्या बहाण्याने सतत लोकांशी भेटत राहणे हे भारतीयांच्या आवडीचे काम.. मग त्यांना घरात कोंडणे किती अवघड काम नाही का..??
जो नकारात्मक मनस्थितीत असेल तो काय विचार करेल..??
नकारात्मक विचारसरणीचा माणूस काय काय करेल तर
सगळ्यात पाहिले तर तो माणूस आपल्या घरातला ६-७ महिने पुरेल इतका धान्यसाठा, साबण, अँटिसेप्टिक औषधे आणि असंख्य न लागणाऱ्या वस्तू सुद्धा भरून ठेवेल..
जे कधी लागणारही नाही असेही काहीबाही तो विकत घेऊन ठेवेल.. बँकेतले पैसे काढून घरी आणून ठेवेल..
ह्याच्या बरोबर उलट असतील सकारात्मक माणसे..
सकारात्मकता हा खरे तर उत्तम गुण आहे..
आणि म्हणूनच सकारात्मक असणारे लोकांच्या मदतीला जातील ,त्यांना बेड , औषध ,इंजेक्शन ,जेवण मिळवून देण्यासाठी आपले सगळे संपर्क वापरतील आणि गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करतील आणि अगदी घरात बसून या संकटा पासून सुटका होण्यासाठी फक्त चर्चा करतात ना त्यांना तोंडात बोटे घालायला लावतील असे काम करून दाखवतील अगदी एकाद्या योध्या सारखे आणि हेच काम आज खूप सामजिक संस्था , ग्रुप करत आहेत आणि खरंच अभिमान आणि आपुलकी वाटते अश्या लोकांबद्दल ,
मराठा सहकार्य समूह याचं उद्देशाने आणि याचं मार्गाने गेली ६ महिण्यापासून काम करत आहे अगदी २४ /७ न थकता आणि कोणतीही अपेक्षा न बाळगता आणि याचा मला सार्थ अभिमान आहे की बारामतीत आज २००० योद्धे लढतायत आणि लढाईंत जिकतोय काही प्रमाणात आणि याची पावती रोज मिळते आहे
सगळ्यांना एवढच सांगणे आहे कृपया आपल्या परीने जेवडी मदत करता येईल ती करा आणि मी कश्या प्रकारे मदत करू , काय करू ,कसे करू असा प्रश्न पडत असेल तर कृपया मला सांगा मी माझे अनुभव आणि अश्या टीम बरोबर तुम्हाला जोडून देतो जिथे तुम्हाला नक्कीच एक तरी जीव वाचण्यासाठी संधी मिळेल आणि ते पुण्य तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील तर नक्की पुढे या आणि टीम शी जुडा , आणि माहिती साठी संपर्क करा.
हेमंत बबन जगताप
फोन -९९७०००५०७२