"बारामतीत जळोची गावात शोककळा" "आईचा कोरोनाने तर मुलीचा सर्पदंशाने मृत्यू"

मृत झालेल्या मनीषा ठोंबरे व शेजारील छायाचित्रात पकडलेला साप व सर्प मित्र अमोल जाधव
बारामती:
बारामती शहरातील जळोची गावात राहणारे ढाळे कुटुंबियांच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.(शनिवार 22 मे 2021 ) 
काही दिवसांपूर्वीच आई सौ.सरूबाई बंडा ढाळे यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला असल्याने  कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची मुलगी सौ.मनीषा ठोंबरे या रेडणी, तालुका – इंदापूर, जिल्हा – पुणे या ठिकाणाहून जळोची गावात आल्या होत्या,
जळोची येथे राहत्या घरी सकाळी 7.30 वाजता झाडलोट करत असताना त्यांना पायाला सर्पदंश झाला, त्यांनी साप पाहिला पण साप अडचणीत गेल्याने परत दिसला नाही. त्यांना तात्काळ उपचाराकरिता दवाखान्यात हलवण्यात आले, त्यांना वाटेतच जास्त त्रास होऊ लागला, सर्पदंशावर लागणारे व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी बारामती मधील बरेच हॉस्पिटलमध्ये पेशंटला फिरवले, मात्र त्यांना बेड उपलब्ध झाला नाही व यादरम्यान त्यांचा सकाळी 10.30 वाजता मृत्यू झाला, त्यानंतर त्यांना जळोची येथुन त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी हलवण्यात आले, त्यांना 3 वर्षाची मुलगी व 6 वर्षाचा एक मुलगा आहे… त्यानंतर  कुटुंबियांना त्याच जागेवर वाँशिंग मशिन जवळ फरशी खाली जाताना एक साप दिसला, त्यांनी बारामती येथील ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन संस्थेचे सर्पमित्र अमोल जाधव यांना साप पकडण्यासाठी फोन केला, सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी पोहचले व त्यांनी फरशी खाली लपलेला 3 फुटांचा इंडियन स्पेक्टॅकल कोबरा जातीच्या विषारी नागाला मोठ्या शिताफीने पकडला.. साप पकडल्यानंतर तेथील नागरिक आक्रमक झाले ते म्हणाले या सापाने आमचा एक जीव घेतला आहे, साप आमच्याकडे द्या आम्ही या सापाला मारून टाकणार आहे, परंतु सर्पमित्र अमोल जाधव यांनी कुटुंबियांचे सांत्वन करून सदरील विषारी नागाला बारामती वनविभागाच्या   ताब्यात दिला, वन कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या निर्जनस्थळी निसर्गात या सापाला मुक्त केले..


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!