फलटण:
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे दि.१०मे पासून कोरोना विलिनीकरण कक्ष सुरू करण्यात आला या कक्षातील आज अखेर १० कोरोना मुक्त रुग्णांना निरोप देण्यात आला.ग्रामीण भागात गोखळी येथे दि.१० मे पासून सुरू करण्यात आलेल्या कोरोना विलिनीकरण कक्षात २८ कोरोना बाधीत रूग्ण दाखल झाले आहेत त्या पैकी १०रूग्ण कोरोना मुक्त झाले.सर्व रूग्णांना मोफत वैद्यकीय उपचार करण्यात आले.यासाठी गावातील डॉक्टर, याठिकाणी धडपडणारे युवकांनाच द्यावे लागेल.सदर युवक आपल्या कुटुंबात लहान थोर, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती असुन सुद्धा कोरोना महामारी चे गावावर आलेलं संकट आपल्या वर समजून रात्रंदिन रूग्णांनाच्या सेवेसाठी झटत आहेत या कोरोना योध्दा ना आणि त्यांना सर्व प्रकारची मदत करणारे व्यक्तींना लाख लाख सलाम…