गोखळी :
प्रहार जनशक्ती पक्ष फलटण तालुका च्या वतीने केंद्रसारकरने खत दर वाढ व तुर,मुंग,उडीद या सारखे कडधान्यं बाहेर देशातून आयात करत आहेत.
हे धोरण त्वरीत थांबन्यात यावेत. या अनुषंगाने ना.बच्चू भाऊ कडू यांनी महाराष्ट्रातील सर्व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांना आव्हान केले होते की. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व गावात प्रत्येक चौकात कोरोना विषाणू चे नियमाचे पालन करून, केंद्रसरकारच्या निषेधार्थात थाळी व टाळी बजाव आंदोलन करण्यास आव्हान केले होते.
त्या अनुशंगाने आदरणीय ना.बच्चू भाऊ कडू यांच्या हाकेला समर्थन म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा.सातारा तालुका.फलटण च्या वतीने गोखळी येथे केंद्रासरकरचा थाळी व टाळी वाजवून तसेच जोरदार घोषणा बाजी करून. फलटण तालुका अध्यक्ष श्री. सागर गावडे (पाटील). यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर निषेध करण्यात आला.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य श्री. सागर गावडे (पाटील). प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना फलटण मा. ग्रामपंचायत सदस्य श्री. महेंद्र गावडे. ग्रामपंचायत उपसरपंच डॉ. अमित गावडे. ग्रामपंचायत सदस्य श्री.अभिजित जगताप. ग्रामपंचायत मा.उपसरपंच श्री.ज्ञानेश्वर घाडगे.श्री.श्रीकांत चव्हाण श्री.अभिजीत रोकडे. श्री.विजय सुतार.श्री प्रवीण गावडे, दर्शन रोकडे श्री.ज्ञानेश्वर तीवाटने, श्री.नवनाथ काशीद हे कार्यकर्ते उपस्थित होते