15 ऑक्सिमिटर व झाडे देऊन केली कृतज्ञता व्यक्त
सिल्व्हर ज्यूबली रुग्णालयास साहित्य देताना आनंद सावंत व इतर
बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
कोरोना झालेल्या आपल्या आईची योग्य काळजी घेऊन तिला बरे केल्यामुळे वंजारवाडी येथील तरुण उद्योजक आनंद सावंत यांनी सिल्व्हर ज्यूबली हॉस्पिटलसाठी 15 ऑक्सिमिटर व ऑक्सिजन वाढवणारे वृक्ष देऊन डॉक्टरांचा सत्कार केला
स्वतःच्या जीवाची व कुटूंबियाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स व सर्व कर्मचारी वर्ग अहोरात्र साप्ताहिक सुट्टी न घेता रुग्णाची सेवा करीत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून मी खारीचा वाटा म्हणून मी मदत करीत आहे असे आनंद सावंत यांनी सांगितले.
आनंद सावंत यांच्या कामाचे कौतुक वैदकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे यांनी केले या वेळी नगरसेवक बिरजू मांढरे, डॉ सदानंद काळे, डॉ नरवटे ,सर्पमित्र श्री मामा मांढरे, राजमुद्रा ग्रुप चे अध्यक्ष अमर घाडगे ,गणेश मालुसरे, नवनाथ लोखंडे उपस्थित होते