सातारा, दि.21 (जिमाका) : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाच्या निमित्ताने अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सर्वांना प्रतिज्ञा दिली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरेवे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते
आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तिनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु, अशी शपथ यावेळी उपस्थित सर्वांनी घेतली.