फलटण :- विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी शहर पोलिसांनी तीन तरुणांना बेकायदेशीर पिस्टलसह अटक केली असून याप्रकरणी तिघांना तरुणांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० रोजी मध्यरात्री शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांना माहिती मिळाली की, राजु राम बोके हा त्याचे दोन साथीदारांसह एका मित्राला मोटार सायकल वर भेटणे करीता येणार असून राजू राम बोके हा बेकायदेशीर पिस्टल जवळ बाळगत आहे.
ल त्यानुसार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी शहर पोलिस पथकाने सापळा लावला असता. मध्यरात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास एका मोटार सायकल वर तीन जण येताना दिसले असता त्यांना जागीच पकडून पो. नि भारत किंद्रे यांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी राजू राम बोके (वय ३४ रा मंगळवार पेठ फलटण), दिलीप तुकाराम खुडे (वय ३२ वर्षे रा लक्ष्मीनगर फलटण) व मनोज राजेंट हिप्परकर (वय २७ वर्षे रा प्रेमलाताई हायस्कुल जवळ मलटण) असे सांगितले.
यावेळी त्या तिघांची अंगझडती घेतली असता राजू राम बोके यांचे कमरेस एक पिस्टल खोवलेली दिसून आली त्यांची मॅगझीन काढून पाहीली असता त्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याबाबत त्यांचे विचारणा केली असता त्यांचेकडे कोणत्याही प्रकारे परवाना नसल्याचे सांगितले असता तिघांना ताब्यात घेवून त्यांचे कडील पिस्टल , मोटार सायकल , तीन मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी तपास कमी जप्त केला.
सदर प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एन.आर.गायकवाड हे करीत आहेत. या तिन्ही आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक २४ मे रोजी पर्यत ५ दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली.
याप्रकरणी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.के.राऊळ,पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम, सहाय्यक फौजदार एस.एन.भोईटे, पोलिस हेड कॉन्स्टेबल व्ही.पी.ठाकूर, पोलिस नाईक एस.डी.सुळ, पो. ना एस.ए.नाथ, एन.डी.चतुरे , व्ही.एच लावंड,पो.शि ए.एस.जगताप , पो.कॉ एस.ए.तांबे, डी.पी सांडगे यांनी कारवाई केली.