बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले असून उपचारा अभावी अनेकाना आपले प्राण गमवावे लागत आहे.कोरोनावर सर्वत्र प्लाझमा फायदेशीर ठरत असल्याने बारामतीच्या सचिन देवकाते या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाझमा दान चळवळ उभारली असून त्यांच्या माध्यमातून सुमारे तीनशे कोरोना बाधित रुग्णांना प्लाझमा उपलब्ध झाला असल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.
ते स्वतः कृषी पदवीधर असताना कृषी अधिकारी पदाचा राजीनामा देऊन सामाजिक क्षेत्रात पदार्पण केले आहे.
सचिन देवकाते यांनी सोशल मीडियावर ग्रुप तयार करून विविध भागातील समाजसेवकांना यामध्ये सामील करण्यात आले.यामध्ये काम करीत असताना एकमेकांची ओळख नसतानाही मदत करण्याचा प्रयत्न या ग्रुपवर प्रत्येकजण करतो. त्यांचे काम सर्व व्हाट्सअप मेसेज वर चालते व्हाट्सअप ग्रुप रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत करत आहे.
देवकाते यांच्या माध्यमातून कोरोना बाधितांना जेवण पुरवणे, हॉस्पिटल चे बिल कमी करणे,ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणे , गरजूना किराणा देणे,प्लाझ्मा उपलब्ध करून दिले आहेत.आज तागायात जवळ पास 300 कोरोना बाधितांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे. तसेच त्यांनी स्वतः 4 वेळा प्ल्झमा दान केला आहे.रेमेडीसिवर इंजेक्शन्स मिळवून देण्यास मदत केली आहे.गरीब व गरजू लोकांना मोफत रक्त मिळवून देणे, कोरोना संबंधी इतर काही औषधे,रुग्णवाहिका लागल्यास उपलब्ध करून रुग्णांचे मार्गदर्शन व नातेवाईक रुग्णाचे समुपदेशन ते करतात.पश्चिम महाराष्ट्र, बीड , लातूर,बार्शी या भागातील लोकांना त्यांनी मदत केली आहे
कोरोनाच्या काळात ज्यांना रोजगाराची गरज आहे अश्यांना नोकरी उपलब्ध करून दिली आहे. अद्याप 105 जणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे.
त्यांच्या या कार्याचे बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केल आहे.