मशीन भेट देताना जितेंद्र जाधव,नानासाहेब थोरात व इतर (छाया अनिल सावळेपाटील)
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
रविवार दि. १६ मे रोजी सकाळी सिल्वर जुबली हॉस्पिटल व बारामती हॉस्पिटल ला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णाच्या आवश्यकतेनुसार दोन परदेशी बनावटीच्या ऑक्सिजनच्या मशीन श्रायबर डायनॅमिक्स डेअरी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने देण्यात आल्या या प्रसंगी
कंपनीचे रिजनल ऑपरेशन मॅनेजर श्री जितेंद्र जाधव , बिझनेस सपोर्ट मॅनेजर सौ मंजुष्री चव्हाण , श्री अनिल कुमार, श्री विनायक शेटे व युनियन अध्यक्ष डॉ नानासाहेब थोरात व श्री संदीप बनकर श्री मनोज कारंडे व सिल्व्हर ज्यूबली हॉस्पिटल चे वैदकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे,डॉ दिलीप लोंढे,डॉ भास्कर जेधे या कार्यक्रमास उपस्थित होते
उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या सूचनेनुसार कंपनीच्या वतीने ऑक्सिजन साठी महिला ग्रामीण रुग्णालय,सिल्व्हर ज्यूबली रुग्णालय,बारामती हॉस्पिटल ला मदत केली आहे यानंतर रुग्णाच्या संख्येनुसार व रुग्णालय च्या मागणी नुसार सामाजिक बांधीलकी म्हणून मदत करणार असल्याचे रिजनल ऑपरेशन मॅनेजर जितेंद्र जाधव यांनी सांगितले.