गोखळी (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी गोखळी ग्रामपंचायत व लोकसहभागातून तरूणांनी एकत्र येऊन गोखळी ग्रामपंचायतीचे नवीन इमारत व प्राधमिक शाळेत २० बेडचे कक्ष सुरू करण्यात आला असुन गावातून ‘ कोरोना’ हद्दपारीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.सौम्य लक्षणे असलेले रूग्ण घरीच थांबत आहेत. सर्व सामान्यांना घरात जास्त माणसं असतील तर इतरांना सुध्दा संसर्ग होऊन वयोवृद्ध रूग्णांना धोका पोहोचू शकतो आसपास संसर्ग वाढ होऊ नये यासाठी गावातच विलिनीकरण कक्ष सुरू करण्यात आला.यासठी गावातील मदतीचे आवाहन करण्यात आले.यामध्ये गावातील नागरिकांनी पुढं येऊन वस्तू रूपाने तसेचआर्थिक मदत दिली यापुढेही लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली.
कक्षा मध्ये दाखल झालेल्या रूग्णांना वैद्यकीय तपासणीसाठी दररोज डॉ.शिवाजी गावडे, डॉ अमोल आटोळे, डॉ नितीन गावडे,डॉ, विकास खटके,गोखळी आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सानिया शेख , आरोग्य सेविका लोंढे मॅडम,आशा वर्कस सौ दुर्गा आडके रुग्णांना वेळोवेळी भेट देऊन आरोग्य तपासणी करून मोलाचं योगदान देत आहेत. तर रक्त तपासणी सोमनाथ वायसे,गोरख हरीहर यांनी करून देण्यात येईल असे सांगितले.गोखळीचे माजी सरपंच नंदकुमार गावडे यांनी रुग्णांना लागणारी औषधे देतात.रुग्णाना दररोज पै.दीपक चव्हाण यांनी कोरोना विलिनीकरण कक्षातील रूग्णांना पिण्याचे कोमट पाणी आणि आंघोळीसाठी गरम पाण्यासाठी गॅस शेगडी दिली तसेच रुग्णांना अंडी, चहा,नाष्टा पोहच करतात. रुग्णांना जेवण घरून डबा येतो . कोरोना रुग्णांसाठी दोन वेळा चहा, सकाळी अंडी,फळे, औषध दिली जातात.या विलिनीकरण कक्ष साठी आणखी काही वस्तू साहित्याची गरज असेल तर गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने त्वरित करतात.सदर कोरोना विलिनीकरण कक्ष उभारण्यासाठी सरपंच सौ.सुमनताई गावडे, उपसरपंच डॉ अमित गावडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, माजी उपसरपंच राधेश्याम जाधव, ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगताप, शांताराम गावडे, पोलिस पाटील विकास शिंदे,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर गावडे , ग्रामविकास अधिकारी गणेश दडस आणि गोखळीतील युवा तरुणांची कोरोना हद्दपारीची धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे.