बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील “एक हात मदतीचा युवा प्रतिष्ठानने” बारामती शहर मधील कोविड सेन्टर व शासकीय,खाजगी रुग्णालयात कोरोंना रुग्णांना व शहरातील बंदोवस्त वर असणाऱ्या पोलीस,गृहरक्षक दल चे कर्मचारी यांच्या साठी अल्पोहार व अंडी वाटप चा उपक्रम सुरू केला आहे.दररोज सकाळी 8 ते 12 या वेळात विविध रुग्णालयात व बंदोवस्त वर असणाऱ्या पोलीस साठी हा अल्पोहार मागणी नुसार विविध ठिकाणी पुरविला जातो.
कोरोना रुग्णाच्या च्या मदती साठी बारामती मधिल ग्रामीण भागातील युवकानी एक उपक्रम राबविला आहे “एक हात मदतीचा “ त्या मधे त्यानी बारामती मधिल कोरोंना पेशंट , त्यांचे नातेवाइक व पोलिस बांधवासाठी मोफत नाष्टा, फळे व उकडलेली अंडी वाटप करत आहेत ,तसेच हा उपक्रम हाती घेउन त्यानी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे
एक हात मदतीचा युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे राहुल शिर्के,आशिश डोईफोडे,
शुभम इंगवले ,हर्षद गवळी,सुरज कदम ,आकाश ताटे,बंटी पाटील, नांदेडकर याच्या मार्फ़त हा उपक्रम चालु केला आहे ,तसेच आँल स्पोर्ट असोसिएशन चें सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.