जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
मीरा क्लीन फ़ुएल्स लिमिटेड अंतर्गत अनुविरा प्रोड्युसर च्या जैविक इंधन व सेंद्रिय शेती प्रकल्पाचे उदघाटन शुक्रवार 14 मे रोजी अक्षय तृतीया च्या मुहूर्तावर भूमिपूजन झाले. सदर कंपनीने भारतातील 5500 तालुक्यात सदर प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठरवले असून सदर कंपनीच्या पहिल्या १०० तालुक्यात येण्याचा मान अनुविरा प्रोड्युसर कंपनी लिमीटेड, बारामती कंपनीने पटकावला आहे. या कंपनीच्या जैविक इंधन व सेंद्रिय शेती प्रकल्पाचे भूमीपूजन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. कंपनीचे संचालक गणेश कदम, माळेगाव सोसायटी चे उपाध्यक्ष निशिगंध तावरे , श्रीकांत लावंड ,रवी वाबळे- आदी मान्यवर उपस्तीत होते.
या प्रकल्पामध्ये नेपियर (हत्ती ) गवत यापासून जैविक इंधन तसेच सेंद्रीय खत निर्मिती केली जाणार आहे.सदरचा प्रकल्प हा शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून चालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शाश्वत उत्त्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. ग्राम पातळीवर उद्योजक नेमणूक करून ग्रामीण भागात रोजगार वाढीस मदत होणार आहे. भूमिहीन शेतकऱ्यांना देखील विविध योजनांद्वारे रोजगार आणि उत्पन्नाचा मार्ग कंपनी मार्फत देण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी सभासद नोंदणी चालू झालेली आहे. बारामती तालुक्यातील शेतकरी, बेरोजगार तसेच भूमिहीन व्यक्तींनी अनुविरा प्रोड्युसर कंपनी लिमीटेड कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या आणि आपल्या तालुक्याच्या विकासासाठी हातभार लावण्याचे आवाहन अनुविरा प्रोड्युसर कंपनी लिमीटेड, कंपनी मार्फत संचालक गणेश कदम यांनी आव्हान केले व आभार मानले
कोरोना व लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपाचा कार्यक्रम संपन्न झाला