जळोची : फलटण टुडे वृत्तसेवा
रेमीडिसीविर इंजेक्शन च्या किंमती जाहीर करून ज्या रुग्णांना ते मिळाले आहे त्यांची नावे दररोज जाहीर करून बिल द्यावेत असे मागणी बारामती तालुका भाजपा च्या वतीने प्रांताधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे .
शासन निर्णया प्रमाणे मा. जिल्हा अधिकारी यांचे व प्रांत कार्यालय चे नियंत्रण रेमीडिसीविर या इंजेक्शन चा पुरवठा ठराविक वितरक यांचे कडून हॉस्पिटल ला केला जात आहे.
रेमीडिसीविर इंजेक्शन चे दर शासनाने निश्चित केले असताना अनेक ठिकाणी वेगवेगळे आहेत त्या मुळे ते दर काय आहेत याची माहिती प्रत्येक इस्पितळात दर्शनी ठिकाणी लावून वआपण स्वतः प्रसार माध्यमा द्वारे जनतेस कळवावे.बिल घेऊन च इंजेक्शन घ्यावे/द्यावे अश्या सक्त सूचना संबंधित इस्पितळात कराव्यात त्यामुळे डुप्लिकेशन पण कमी होई.
कोणत्या रुग्णांना इंजेकशन दिले आहे त्याची यादी दररोज हिस्पिटल च्या दर्शनी ठिकाणी लावणेचे आदेश व्हावे अशी मागणी भाजपा च्या वतीने तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी केली आहे
अन्यथा न्यायालयात जाऊ
प्रचंड महामारी च्या काळात जनता होरपळत असताना या उपाय योजना आपण यापूर्वी च करायला पाहिजे होत्या परंतु आपण अद्याप तोंडी विनंती करून ही केल्या नाहीत.
आपण त्वरित वरील बाबीची अंमलबजावणी केली नाही तर आपणा विरुध्द योग्य ती तक्रार मा. न्यायालयामध्ये करणेत येईल हे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे .