प्रतिक्रिया
सचिनशेठ सातव व सातव कुटूंबीय यांनी ईद निमित्त सामान वाटप केल्याने या कोरोना संकटात फार मोठा हातभार लागल्याने त्यांना मनापासुन धन्यवाद! फारूख बागवान श्रीरामनगर कसबा बारामती
रमजान ईद निमित्त सचिनशेठ सातव व सातव कुटुंबीय यांनी कसब्यातील सर्व मुस्लिम समाजाला साहित्य वाटप केल्याने मुस्लिम समाजातील लोकांन कडुन आभार व्यक्त करत त्यांना मनापासुन दुआ देत आहेत.
कसबा मुस्लिम जमात बारामती
ईद निमित्त सातव परिवाराच्या वतीने पंधराशे कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य किट व दुध वाटप.
बारामती :-
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे हाताला काम नाही. रोजचा दिवस कसा भागवायचा याची चिंता अनेक मुस्लिम कुटुंबीयांना जाणवत होती. मुस्लिम
बांधवांची रमजान ईद गोड व्हावी, यासाठी गटनेते सचिन सातव व नगरसेवक सूरज सातव, माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांच्या वतीने ईद निमित्त पंधराशे कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य किट व दुध वाटप (दि:१२) रोजी करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भाव पाहता संपुर्ण राज्यासह देशामध्ये लाॅकडाऊन सुरु असुन जवळपास सर्वच दुकाने,उद्योगधंदे,बंद असल्यामुळे मजूर,कामगार,मध्यमवर्गीय नौकरदार तसेच ७० टक्के मुस्लिम समाज हा व्यवसायात असल्याने लॉकडाऊनच्या काळात मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यात फार अडचणी निर्माण झाल्या होत्या. सण वार कोरोनाच्या छायेत असल्याने हि बाब पाहुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार व आशीर्वादाने मा. नगराध्यक्ष सदाशिव बापुजी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते सचिन सातव ,नगरसेवक सुरज सातव माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांनी सलग दुसऱ्या वर्षी देखील पंधराशे कुंटबांना शिर्रखुमा साहित्य किट व दुध वाटप केले आहे.सदर किट साठी मा. ना. अजित दादा यांनी साखर दौंड शुगर मार्फत व बारामती दूध संघ मार्फत दुधाची सोय करण्यासाठी सूचना केल्या. दरम्यान यावेळी सबंध मुस्लिम बांधवांनी मा. ना. अजित दादा पवार व सातव कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी पत्रकार मन्सूर शेख,फिरोज सय्यद,आक्रम बागवान,फिरोज शेख,अभिजित ढवान पाटील ,अनिस मोमिन,समीर शेख उपस्थित होते.तर नगरसेविका डॉ सुहासिनी सातव , नगरसेवक संतोष जगताप , नगरसेवक गणेश सोनवणे यांनी मुस्लिम बांधवांना बरोबर घेऊन घरोघरी जाऊन साहित्य वाटपाचे नियोजन केले.
कोरोना महामारी च्या वाईट काळात तुम्ही व तुमच्या परिवाराने मागील वर्षी आणि सध्या चालू रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजाची आपण आपुलकीने व वाईट वेळेत सहकार्य आणि मदत करण्याची भूमिका घेतली व मुस्लिम समाज्याची ईद साजरी करण्यासाठी आपण व आपला परिवार कट्टीबद्ध असल्यामुळे मुस्लिम समाज आपलं आभार शब्दात व्यक्त करू शकत नाही तरी सुद्धा आम्ही जाणीव पूर्वक आपल्या परिवाराचे आभार व्यक्त करतो आणि ऋन व्यक्त करीत आहोत आपले आभारी :: बारामती आम मुस्लिम युथ फौंडेशन बारामती
कोरोना महामारी च्या वाईट काळात सचिन शेठ व सातव परीवार यांनी रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजाला आपुलकीने सहकार्य करुण मदत केली ईद साजरी करण्यासाठी आपण व आपल्या परिवारने मदत केल्यामुळे गोकुळ नगर मुस्लिम समाज आपले आभारी आहे
आभार : शाहबुद्दीन गफुर शेख (गोकुळ नगर बारामती)