जळोची : फलटण टुडे वृत्तसेवा
अंनजगाव ग्रामपंच्यात व प्राथमिक आरोग्य केंद्र करहावागज यांच्या संयुक्त विद्यमाने करोना ऑंटीजन तपासणी करण्यात आली या प्रसंगी 114 नागरिकांची तपासणी करण्यात आली या मध्ये 6 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले.त्या सर्वांना कोरोना सेन्टर मध्ये दाखल करण्यात आले .
सदर कॅम्प चे उदघाटन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, व सोमेश्वर साखर कारखान्याचे मा, व्हाईस चेअरमन व विद्यमान सरपंच बाळासाहेब परकाळे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
माजी सरपंच दिलीप परकाळे, तसेच उद्योजक सुरेश परकाळे ,माजी उपसरपंच मिलिंद मोरे, पोलीस पाटील ईश्वर खोमणे ,तंटामुक्ती अध्यक्ष विलास परकाळे, उपतंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब कुचेकर, ग्रामपंचायत कर्मचारी आकाश वायसे ,राजू चव्हाण ,बाप्पू परकाळे प्रल्हाद परकाळे, सदाशिव परकाळे, व इतर मान्यवर उपस्तीत होते
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, लोणीभापकर वैद्यकीय अधिकारी सुरज माने, यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनगाव हायस्कूल येथे आंटीजन स्टिक कॅम्प घेण्यात आला यावेळी करावागज उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ .शीतल बोबडे, आरोग्य सेविका भोपळे मॅडम, पाखरे मॅडम, आरोग्य सहाय्यक रमेश जाधव, आरोग्य सेविका राणी भंडलकर ,शोभा मोरे यांनी सदर कॅम्प साठी साह्य केले.