फलटण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद- सभापती शिवरूपराजे

फलटण :

फलटण तालुक्यातील शिक्षकांनी कोरोना परिस्थितीमध्ये केलेले कार्य ,तसेच त्यांच्यावर सोपवलेली  जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. चेक पोस्ट ड्युटी, भरारी पथक ,प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियुक्ती,कोरोना नियंत्रण कक्ष, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, ऑनलाइन शिक्षण, इत्यादी जबाबदारी सर्व शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी 
श्री.रमेश गंबरे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पार पाडलेली दिसून येते. तसेच ज्या ज्या वेळी आर्थिक साह्याचे आवाहन केले त्या त्या वेळेस फलटण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती आदरणीय,मा.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर,
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, मा.,श्री.दिपकराव चव्हाण साहेब , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष,मा.श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर,
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,मा.उदयदादा कबुले,प्रांताधिकारी 
मा.श्री.शिवाजीराव जगताप साहेब,फलटण तालुका पंचायत समितीचे सभापती आदरणीय मा.श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर साहेब,उपसभापती मा. सौ.रेखाताई खरात मॅडम,गटविकास अधिकारी मा.श्रीम.अमिता गावडे-पवार मॅडम,गटशिक्षणाधिकारी मा.श्री.रमेश गंबरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व वरील मान्यवरांनी केलेल्या आव्हानामुळे व फलटण तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यांचे सहकार्याने कोरोना संदर्भात जमा झालेल्या मदतनिधीच्या माध्यमातून ६/५/२०२१ रोजी लोणी काळभोर,पुणे येथून २५ आॅक्सिजन सिलेंडर ( 175 CuM) मदत फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय तसेच जाधववाडी येथील कोव्हिड सेंटरला उपलब्ध करून देणेत आले.यासाठी फलटण तालुक्यातील सर्व शिक्षक बंधु- भगिनींनी,सर्व केंद्रप्रमुख,सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी प्रत्येकी २०००/रूपये देऊन मौलाचे आर्थिक सहकार्य केले.त्यांच्या सहकार्यामुळेच आपण अल्प वेळेत मोठा अर्थिक निधी संकलित करू शकलो.
त्याबद्दल फलटण तालुक्यातील सर्व शिक्षक बंधु- भगिनींचे,सर्व केंद्रप्रमुख यांचे हार्दिक आभार मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!