सातारा दि. 11 (जिमाका): राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याच्या सुविधे अंतर्गत लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून यासाठी 15 मे पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
यासाठी आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.