सातारा दि. 9 (जिमाका) : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये, सातारा जिल्ह्यातील सध्यस्थितीत लागू असलेले निर्बंध 15 मे अखरे वाढविण्यात आले आहेत. याबाबतचे प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.